रिक्शा ड्रायव्हरचा मुलगा असा बनला स्टार क्रिकेटर, पहिली कमाई फक्त 500 रुपये

Fri 16th Mar, 2018 Author: Chetan Pardeshi

IPL

March 16 (CRICKETNMORE)

इंडियन क्रिकेटर आणि IPL चा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज मंगळवारी आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 मार्च 1994 रोजी हैदराबाद येथे जन्मलेला सिराज अतिशय सामान्य कुटुंबातून आहे. त्याच्या वडिलांनी ऑटो रिक्शा चालवून त्याचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न साकारले. त्याचे लहानपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले आहे.

पहिली कमाई 500 रुपये, आता बनला कोट्याधीश

  •  मोहम्मद सिराजने क्रिकेटमध्ये पहिली कमाई म्हणून 500 रुपये कमवले होते. IPL च्या लिलाव दरम्यान त्याने सांगितले होते, की एका क्लबकडून खेळताना त्याने पहिली 500 रुपये कमवले होते. त्या मॅचमध्ये त्याचे मामा कॅप्टन होते. 25 ओव्हरमध्ये 20 धावा देऊन त्याने 9 विकेट्स पटकावल्या होत्या. ते 500 त्याच्या मामानेच खूश होऊन दिले होते.
  • उल्लेखनीय बाब म्हणजे, 2017 मध्ये त्याने आयपीएल डेब्यू केला होता. त्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला 2.60 कोटी रुपयांत विकत घेतले होते. 
  • आयपीएल सीजनमध्ये कोट्यधी रुपये जिंकल्यानंतर त्याने आपल्या आई-वडिलांसाठी पॉश परिसरात घर घेणार असे सांगितले होते.
  • नुकतेच झालेल्या आयपीएल IPL 2018 च्या लिलावात त्याला 2.6 कोटी रुपयांत विकत घेण्यात आले. विराटच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून तो खेळणार आहे.

    CHETAN